मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gudi Padwa 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उभारा आकर्षक गुढी, पाहा काय आहे यंदा ट्रेंड, Video

Gudi Padwa 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उभारा आकर्षक गुढी, पाहा काय आहे यंदा ट्रेंड, Video

X
Gudi

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत. बाजारपेठेत यंदा काय ट्रेंड आहे जाणून घ्या.

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत. बाजारपेठेत यंदा काय ट्रेंड आहे जाणून घ्या.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Kolhapur, India

  साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

  कोल्हापूर, 20 मार्च : गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मराठी नववर्षाची सुरुवात होते ती याच सणादिवशी. घरोघरी पुढे वर्षभर आनंद, सुख, समृद्धी लाभावी, यासाठी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतो. या सणाच्या दिवशी दारात गुढी उभारण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. पण याच परंपरेला सध्या नवीन गोष्टींची जोड दिली जात आहेत. कोल्हापुरात सध्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत. यामध्ये सजवलेल्या गुढ्यांबरोबरच गुढीसाठी लागणारे तयार खण आणि सजवलेले कलश देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

  आजकाल बऱ्याच लोकांना गुढीपाडवा हा गुढी उभारून साजरा करायचा असतो, मात्र जागेअभावी किंवा फ्लॅट संस्कृतीमुळे मोठमोठ्या गुढ्या उभारणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. यासाठीच छोट्या आकाराच्या गुढ्या बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोल्हापुरातील शनिवार पेठ येथील एका दुकानात सहा इंचाच्या गुढीपासून पंधरा फुटांपर्यंत सजवलेल्या गुढ्या मिळत आहेत.

  काय काय आहे विक्रीला ?

  बाजारात सध्या सजवलेल्या गुढ्यांसोबतच संपूर्ण सेट विक्रीला उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये गुढी उभा करण्यासाठीचा पाट, तोही कापड लावून सजवलेला, त्याचबरोबर गुढीवर उपडा करून ठेवण्यासाठीचा सजवलेला कलश, गुढीसाठीचे तयार खण आणि सजवलेली गुढी असा हा सेट मिळतो. तर याबरोबरच अजूनही सजावटीचे साहित्य गुढी सजवण्यासाठी विक्रीला उपलब्ध आहे, असे दुकानदार दीपक पिराळे यांनी सांगितले.

  यावर्षी खणाचा ट्रेंड

  गुढी सजवताना बांबूच्या काठीच्या वरच्या टोकाला एक कलश उपडा करून ठेवला जातो. त्याच्या आतमध्ये खण किंवा साडी वापरली जाते. आता नव्या तयार खणाच्या कापडाचा ट्रेंड बाजारात आला आहे. अगदी सोप्या पद्धतीने गुढीचा टोकाला हे तयार खणाचे कापड बांधता येते. गुढी बरोबर ते आकर्षकही दिसते. यामध्ये एकपदरी, दुपदरी असे प्रकारही उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक याला सध्या पसंती देत आहेत.

  Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? पाहा संपूर्ण पद्धत आणि मुहूर्त, Video

  किती रुपये आहेत किंमती ?

  बाजारात सध्या सजवलेल्या गुढीचा तयार सेट मिळतो. ज्यामध्ये पाट, कलश/तांब्या, काठी, खणाचे कापड असते. यात 6 इंचाच्या गुढीचा सेट 50/-, 9 इंचाचा सेट 100/-, दीड फूटांपासून 4 फूटांपर्यंत सेट 200/- ते 300/- तर 5 ते 15 फूट गुढ्यांचा सेट 120/- पासून 500 /- रुपयांना मिळतो. तर फक्त सजवलेला पाट 50/- ते 250/-, सजवलेली गुढीची काठी 6 फूटांपासून 15 फूट 100/- ते 300/- आणि फक्त सिंगल खण 80/-, डबल खण 150/- रुपयांना मिळत आहे.

  Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video

  कुठे मिळेल हे साहित्य

  कोल्हापुरात सध्या गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र बाजारपेठा सजल्या आहेत. त्यामुळे शहरातील बिंदू चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, राजारामपुरी, जनता बाजार चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याचे साहित्य मिळत आहे. पण ठराविक ठिकाणी अगदी योग्य प्रकारे सजवलेले असे हे गुढीचे तयार सेट मिळतात.

  First published:
  top videos

   Tags: Gudi Padwa 2023, Kolhapur, Lifestyle, Local18, Shopping