मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ग्रंथोत्सव 2022 : कोल्हापुरातील वाचकांसाठी ग्रंथांची मेजवानी, पाहा काय आहे खास? Video

ग्रंथोत्सव 2022 : कोल्हापुरातील वाचकांसाठी ग्रंथांची मेजवानी, पाहा काय आहे खास? Video

X
लोकांमधील

लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोल्हापुरात ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोल्हापुरात ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 9 डिसेंबर : सध्या मोबाईलच्या दुनियेत बरेच लोक वाचनाकडे दुर्लक्ष करताना दिसतायत. यामुळेच ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य सरकारकडून दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोल्हापुरात ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर अशी दोन दिवस दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनामध्ये हे प्रदर्शन सुरू आहे.

काय आहेत कार्यक्रम ?

शुक्रवारी सकाळी ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडी काढून या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर दुपारी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दिनांक शनिवारी (10 डिसेंबर) रोजी सकाळी 11 वाजता "कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री काव्य नाट्यानुभव) आणि दुपारी 3 वाजता “ऐकाल तर वाचाल" या विषयावर व्याख्यान झाल्यानंतर ग्रंथोत्सवचा समारोप कार्यक्रम पार पडणार आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे.

केरळी हॉटेलमध्ये मिळते फेमस कोल्हापूरी डिश, पाहा Recipe Video

या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये कोल्हापूरच्या विक्रमनगर येथील करवीर प्रशालेचे मुलींचे झांजपथक सहभागी झाले होते. या झांज पथकामध्ये झांज, ढोल आणि ताशा याचा समावेश होता. यावेळी दिंडीमधील पालखीत रामायण, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन, श्री विष्णूसहस्त्रनाम चिंतनिका असे धार्मिक ग्रंथ ठेवण्यात आले होते.

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी या ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे.

जुन्या गाण्यांसोबत घ्या कोल्हापुरी भडंगचा आस्वाद, पाहा Video

वाचक प्रेमी आणि ग्रंथप्रेमी लोकांसाठी त्यांच्या आवडीचे ग्रंथ आणि पुस्तके एकाच छताखाली खरेदी करता यावेत, या उद्देशाने या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रकाशक आणि ग्रंथ, पुस्तक विक्रेते सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या वैचारिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, आत्मचरित्रात्मक अशा विविध प्रकारच्या ग्रंथ आणि पुस्तकांचे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे.

First published:

Tags: Kolhapur, Local18