मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोकुळच्या दरात महिन्यात दुसरी वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गोकुळच्या दरात महिन्यात दुसरी वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गोकुळने दूध खरेदी दरात (Gokul Milk Price) पुन्हा एकदा वाढ केली आहे, या वाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहेत.

  • Published by:  Shreyas
कोल्हापूर, 8 सप्टेंबर : गोकुळने दूध खरेदी दरात (Gokul Milk Price) पुन्हा एकदा वाढ केली आहे, या वाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहेत. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने 1 रुपयाची वाढ केली आहे. 11 सप्टेंबरपासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भाववाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं. 11 सप्टेंबरपासून गायीच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधाला 32 रुपये प्रती लीटर एवढा भाव देण्यात येईल, असं गोकुळकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या सहा महिन्यांमध्ये गोकूळने दूध दरामध्ये तब्बल 5 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 1 ऑगस्टला गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात 2 रुपयांनी तर गायीच्या दूध विक्री दरात 1 रुपयाची वाढ केली होती, त्यामुळे मुंबईत म्हशीच्या दुधासाठी 66 रुपये मोजावे लागत होते. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आल्याचं ऑगस्टमध्ये झालेल्या दरवाढीवेळी गोकुळकडून सांगण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यामध्ये अमूल आणि मदर डेअरीनेही दूध दरांमध्ये वाढ केली होती.
First published:

पुढील बातम्या