मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

FIFA नंतरही कोल्हापूरवर कायम राहणार फुटबॉल फिव्हर, 'या' तारखेपासून नवा सिझन सुरू

FIFA नंतरही कोल्हापूरवर कायम राहणार फुटबॉल फिव्हर, 'या' तारखेपासून नवा सिझन सुरू

चाहत्यांना कोल्हापूरच्या 2022-23 साठीच्या फुटबॉल हंगामाची आतुरता लागली आहे.

चाहत्यांना कोल्हापूरच्या 2022-23 साठीच्या फुटबॉल हंगामाची आतुरता लागली आहे.

चाहत्यांना कोल्हापूरच्या 2022-23 साठीच्या फुटबॉल हंगामाची आतुरता लागली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 07 डिसेंबर : सध्या फिफा विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सगळीकडे फुटबॉलचे वातावरण तर पाहायला मिळतच आहे. यातच जिल्ह्यासह बाहेरच्या फुटबॉलपटूंना आणि चाहत्यांना कोल्हापूरच्या 2022-23 साठीच्या फुटबॉल हंगामाची आतुरता लागली आहे. परंतु, आता शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग ही 22 डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त के.एस.ए.लीगचे नामकरण शाहू छत्रपती के.एस.ए. लीग असे करण्यात आले आहे. याच्या लोगोचे अनावरण नुकतेच कोल्हापुरातील राजर्षी शाहू मैदानावर नुकतेच करण्यात आले आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापुरातील वरिष्ठ गटातील 16 संघांनी नोंदणी केलेली आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. यामध्ये परदेशी 24 खेळाडूंची देखील नोंदणी झालेली आहे.

Video : केस कापतानाही मिस होणार नाही फुटबॉलची मजा, पाहा 'लय भारी' आयडिया!

का लांबणीवर गेला फुटबॉल हंगाम?

विद्यापीठस्तरीय विभागीय व आंतरविभागीय स्पर्धा मिरज येथे 4 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या 16 संघांनी मागणी केली होती की, के.एस.ए. च्या हंगामाला 10 तारखेपासून सुरूवात करावी. त्यांच्या मागणीवर विचार करून त्यानुसार के.एस.ए.ने 10 डिसेंबरपासून लीग सरू करण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर पुन्हा विद्यापीठाच्या स्पर्धा पुढे ढकलून त्या 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर या काळात घेतल्या जाणार असल्याचे ठरले. त्यातच आंतर जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली.

या चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा संघ जाणार आहे आणि त्या संघामध्ये असणारे खेळाडू हे या के.एस.ए. लीग मधील प्रत्येक संघातील काही खेळाडू असणार आहेत. या सर्व कारणांमुळे आता बहुप्रतीक्षित शाहू छत्रपती के.एस.ए. लीग ही स्पर्धा 22 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून देण्यात आली आहे.

Datta Jayanti : ब्रिटीश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून साकारली दत्ताची मूर्ती, पाहा Video

संघ व्यवस्थापकांचे टेन्शन वाढले

फुटबॉल हंगाम आता इतक्या लांबणीवर गेल्याने प्रत्येक संघाच्या व्यवस्थापनाचे गणित बिघडले आहे. लाखो रुपये गुंतवलेल्या संघ व्यवस्थापनाला पुढील नियोजनाचा प्रश्न पडला आहे. तर दुसरीकडे कोरोना नंतर होणाऱ्या या मोठ्या फुटबॉल हंगामासाठी फुटबॉल प्रेमींना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

संतोष ट्रॉफीसाठीच्या देखील सामन्यांची प्रतीक्षा

तर यंदा कोल्हापुरात प्रथमच मानाच्या संतोष ट्रॉफी स्पर्धेची प्राथमिक फेरीतील ग्रुप चारचे सामने पार पडणार आहेत. 7 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान सहा संघांचे एकूण 15 सामने होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण व दादरा, हरियाणा या राज्यांचे संघ कोल्हापूरच्या फुटबॉल मैदानात भिडणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे फुटबॉल प्रेमी या स्पर्धेच्या देखील प्रतीक्षेत आहेत.

First published:

Tags: Kolhapur, Local18