Home /News /maharashtra /

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाच्या फोनवर येणार Alert, काय आहे जुगाड?

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाच्या फोनवर येणार Alert, काय आहे जुगाड?

आपत्कालीन परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रातील (kolhapur flood affected area) प्रत्येक कुटुंबाला alert मिळणार आहे. तुमच्या मोबाईल फोन द्वारे हा अलर्ट जाणार

  कोल्हापूर, 24 मे : मागच्या तीन वर्षा कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणाला महापुराचा (kolhapur flood) मोठा फटका बसला. 2019 आणि 2021 साली महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील लाखो घरे उद्धवस्त झाली. यामुळे मागच्या तीन वर्षांचा अंदाज घेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने (kolhapur) योग्य खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. मागच्या काही दिवसांपासून पूर नियंत्रणाबाबतीत बैठकांचे आयोजन सुरू आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रातील (kolhapur flood affected area) प्रत्येक कुटुंबाला alert मिळणार आहे. तुमच्या मोबाईल फोन द्वारे हा अलर्ट जाणार असल्याने नागरिकांना वेळीच सावध होता येणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली आहे.

  दरम्यान जुलै, ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसाने अचानक धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येते. किंवा सलग पडणाऱ्या पावसाने नदीकिणारी असणाऱ्या गावांमध्ये अचानक पाणी येण्याची शक्यता असते अशा आपत्कालीन परिस्थितीतील प्रत्येक अपटेड आता पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला मोबाईल फोनवर मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्रातील व गावांतील डेटाबेस संकलनाचे काम सुरू केले आहे. यामुळे बाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला पाऊस, पूर आदींसह नैसर्गिक आपत्तींबाबतचा 'अलर्ट' मिळणार आहे.

  हे ही वाचा : weather forecast : मुंबई, कोल्हापूर, कोकणासह विदर्भाला पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा alert

  कोल्हापूर जिल्ह्यात 2005 आणि 2006 साली पूरस्थिती गंभीर झाली होती. यानंतर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावी करण्यात आली. 2019 आणि 2021 सालीही जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसला. यामध्ये हजारो हेक्टर शेती, पाळीव जनावरे, मनुष्यहानी झाली होती.

  कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत कमीत कमी वित्तहानी तसेच जीवितहानी होणार नाही, याच दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्यामध्ये 'public address system'ची आता राज्यभर दखल घेण्यात आली. यामध्ये आता बाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला ‘अलर्ट' देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 2021 साली पूरबाधित झालेल्या 409 गावांतील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी दोन दिवसांत जिल्ह्यातील 3 हजार कुटुंबांची नोंदणी झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

  हे ही वाचा : राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, कोण करू शकतं Apply?

  सस्टीम'ची आता राज्यभर दखल घेण्यात आली. यामध्ये आता बाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला 'अलर्ट' देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 2021 साली पूरबाधित झालेल्या 409 गावांतील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी दोन दिवसांत जिल्ह्यातील 3 हजार कुटुंबांची नोंदणी झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

  ...असा मिळणार 'अलर्ट'

  पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील किमान एकाचा व्हॉटस् अॅप क्रमांक प्रशासनाकडे नोंद असेल. तालुकानिहाय, गावनिहाय त्यांची स्वतंत्र यादी असेल. ती संगणकीय प्रणालीशी जोडली जाईल. याद्वारे जिल्ह्यात पुढच्या दोन-तीन दिवसांत कसा पाऊस आहे. धरणांतील पाणीसाठ्याची काय स्थिती राहील, सध्या किती पाणीसाठा आहे. धरणांतून पाणी किती व कधी सोडणार, नदीची पाणी पातळी किती वाढली आहे. कोणते बंधारे पाण्याखाली गेले आदी आगाऊ आणि दैनंदिन माहिती त्या व्यक्तीच्या व्हॉटस् अॅपवर पाठवली जाईल. 'पब्लिक अॅड्रेस सिस्टीम'वरून दिल्या जाणाऱ्या माहितीची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपही त्यांना पाठवली जाईल.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Rain flood, Rain in kolhapur

  पुढील बातम्या