मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूर : अंबाबाईला भेटायची ओढ; भाविकाने गाभाऱ्यातच सोडला जीव, घटनेनं हळहळ

कोल्हापूर : अंबाबाईला भेटायची ओढ; भाविकाने गाभाऱ्यातच सोडला जीव, घटनेनं हळहळ

दर्शन रांगेत भाविकाचा मृत्यू

दर्शन रांगेत भाविकाचा मृत्यू

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकाचा अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 30 मार्च : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकाचा अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामनाथ गबाजी जाधव वय 62 वर्ष रा. मोर्विस, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रामनाथ जाधव हे दक्षिण भारताची सहल करून परतत होते. त्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांग लावली. मात्र या रांगेत त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

पंधरा दिवसांची सहल  

रामनाथ जाधव हे आपल्या चार मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीसाठी निघाले होते. सहलीहून परतताना त्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन अंबाबाईचं दर्शन घेण्याचा प्लॅन तयार केला. ते देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या रांगेत उभे राहिले. मात्र तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. रामनाथ जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील मोर्विसचे रहिवासी होते.

First published:
top videos

    Tags: Kolhapur