मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी कुठली? कोल्हापूर, सांगली की पुणे? दीपाली सय्यद यांचीही उडी

पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी कुठली? कोल्हापूर, सांगली की पुणे? दीपाली सय्यद यांचीही उडी

wrestler

wrestler

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा आज कोल्हापुरात केली. मात्र याचबरोबर आता नवा वाद निर्माण झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 20 मार्च : अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा आज कोल्हापुरात केली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणारी ही स्पर्धा शासनमान्य आणि अधिकृत असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र यापूर्वी पुणे आणि सांगली जिल्ह्यातही महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घोषित झाल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

सांगली आणि पुण्यातही स्पर्धेची घोषणा

सांगली आणि पुण्यात महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांची घोषणा यापूर्वीच झाली असताना आता कोल्हापुरात दीपाली सय्यद यांनीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा केलीये. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कुस्तीपंढरी कोल्हापुरात या स्पर्धेचा शड्डू घुमणार आहे. मात्र तत्पूर्वी दोन स्पर्धा जाहीर झाल्याने नावा वाद निर्माण झाला आहे. मात्र दीपाली सय्यद यांनी आपलीच स्पर्धा शासनमान्य आणि अधिकृत असल्याचा दावा करत इतर स्पर्धांवर निशाणा साधलाय.

कोणती स्पर्धा अधिकृत 

दरम्यान यापूर्वी  महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या संमतीनं दिनांक 23 व 24 मार्च रोजी सांगलीमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भारतीय कुस्ती परिषदेच्या अस्थायी समितीने 1 ते 7 एप्रिल दरम्यान महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणती स्पर्धा अधिकृत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आम्हाला फक्त 'त्यांचा' पत्ता सांगा; अंनिसचे बागेश्वर बाबांना नवे चॅलेंज, बाबा आव्हान स्विकारणार?

सर्व मान्यता मिळाल्याचा दावा 

सय्यद यांच्याकडे शासनाने स्पर्धा भरवण्याचे दिलेले पत्र आहे. मात्र त्यांना कुस्तीगीर परिषदेची परवानगी घ्यावी लागणार आहे. दीपाली सय्यद यांनी आपणाला सगळ्या मान्यता मिळाल्या असल्याचा दावा केला आहे. तर सांगलीत सुरु असलेल्या स्पर्धेच्या संयोजकांनीही आपलीच स्पर्धा अधिकृत असल्याचे म्हणत सय्यद याना उत्तर दिले आहे.

First published:
top videos