मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोखंडी रॉडचा एक घाव अन् खेळ खल्लास; लेकीनेच बापाला दिला भयंकर मृत्यू, कोल्हापुरातील थरारक घटना

लोखंडी रॉडचा एक घाव अन् खेळ खल्लास; लेकीनेच बापाला दिला भयंकर मृत्यू, कोल्हापुरातील थरारक घटना

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी याठिकाणी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला (Attack with iron rod) करून आपल्या जन्मदात्याचा जीव घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

इचलकरंजी, 23 फेब्रुवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील इचलकरंजी (Ichalkaranji) याठिकाणी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला (Attack with iron rod) करून आपल्या जन्मदात्याचा जीव (Daughter killed father) घेतला आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी तरुणीनं स्वत: पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतर, पोलिसांनी संशयित तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.

शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या बर्गे मळा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर 21 वर्षीय मुलगी साक्षी शांतीनाथ केटकाळे हिने लोखंडी गजाने बापाच्या डोक्यात घाव घातला. हा घाव इतका भयंकर होता की या हल्ल्यात डोक्याच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला.

हेही वाचा-आधी विहिरीत ढकलून दिले अन् वरून टाकला दगड, आईने सुपारी देऊन लेकीला संपवले

हा वार होताच घरातून एकच आरडाओरडा सुरू झाला. चिरकण्याचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने शांतीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वी केटकाळे यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

हेही वाचा-लेस्बियन पत्नीसोबत शरीर संबंधासाठी पतीची जबरदस्ती; पत्नीने दिली भयंकर शिक्षा!

पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत रात्री उशीरा संशयित आरोपी मुलीसह तिच्या आईला ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वादानंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. लेकीनेच बापाची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Murder