कोल्हापूर, 04 जानेवारी: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासे येथील रहिवासी असणाऱ्या एका प्रेमीयुगुलानं कोल्हापुरात (Kolhapur) जाऊन आत्महत्या (Couple commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्याही घरच्यांनी प्रेमविवाहाला (Family refused to love marriage) विरोध केल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दोघांनीही 31 डिसेंबरच्या रात्री अंबाबाई मंदिर परिसरातील यात्री निवासामध्ये गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
राहुल विश्वास मच्छे (वय-25) आणि प्रियांका विकास भराडे (वय-22) असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. दोघंही अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. दोघांना एकमेकांशी प्रेमविवाह करायचा होता. पण दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे नैराश्य आलेल्या प्रेमीयुगुलाने कोल्हापुरात देवदर्शनासाठी जाऊन आत्महत्या केली आहे.
हेही वाचा-मरणानंतर एकत्र झालेच; कपलने Whatsapp स्टेटस ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी प्रेमीयुगुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटही आढळली आहे. ‘आम्ही दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतो. पण आमचं प्रेम कोणाला कळलंच नाही. या जन्मात एकत्र राहू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो’ असं त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे.
हेही वाचा-हिंगोली: सासरवाडीला गेला अन् परतलाच नाही; पत्नीसह भयावह अवस्थेत आढळला तरुण
पोलिसांनी त्यांच्याजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून नातेवाईकांशी संपर्क साधला असून घटनेची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मृत प्रियांका भराडे हिचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहापूर्वीपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Suicide