मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरात हद्दवाढीचा वाद पेटला, केएमटी बसेस रोखल्या

कोल्हापुरात हद्दवाढीचा वाद पेटला, केएमटी बसेस रोखल्या

कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात कृती समिती आज पहाटेच रस्त्यावर उतरली आहे.

कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात कृती समिती आज पहाटेच रस्त्यावर उतरली आहे.

कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात कृती समिती आज पहाटेच रस्त्यावर उतरली आहे.

  • Published by:  sachin Salve
कोल्हापूर, 12 सप्टेंबर : कोल्हापूरमध्ये हद्दवाढीचा मुद्दा पेटला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना महापालिकेने बसेस पुरवू नयेत अशी मागणी करत या बसेस आज कृती समितीने रोखून धरल्या आहेत. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. कोल्हापूर हद्द वाढीच्या विरोधात कृती समिती आज पहाटेच रस्त्यावर उतरली आहे. महापालिकेच्या के एम टी वर्कशॉपमध्ये हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येनं कृती समितीचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले आहे. पहाटे ५ वाजल्यापासून महापालिकेच्या परिवहन मुख्य यंत्र शाळेसमोर आंदोलन करण्यात आले. केएमटीचे 24 पैकी 22 तोट्यातील रूट बंद झालेच पाहिजेत असे फलक हातात घेवून घोषणाबाजी करण्यात आली. केएमटी बसचा महिन्याला १ कोटी ६५ लाखांचा तोटा होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. (Kolhapur flood : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशनचे नियोजन करा : नीलम गोऱ्हे) महापालिका तोट्यात असतानाही ग्रामीण भागाला बससेवा पुरवते मात्र ग्रामीण भागातली जनता पालिकेच्या सेवा वापरूनही हद्दवाढ करण्यास मात्र विरोध करते, असा कृती समितीचा आरोप आहे. त्यामुळे दळणवळणाद्वारे ग्रामीण भागाचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे होत आहे. दरम्यान, हद्दवाढीच्या मागणीसाठी केएमटी बसेस रोखल्याने प्रवाशांचे मोठ हाल होत आहे. एक ही बस आज रस्त्यावर धावत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रिक्षाचे दर ही परवडत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पहाटे 5 पासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने मात्र कानाडोळा केल्याने बसेस अद्यापही बंदच आहेत.
First published:

पुढील बातम्या