मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MLA Chandrakant Jadhav : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

MLA Chandrakant Jadhav : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant jadhav Passes Away) यांचं गुरुवारी निधन झालं आहे.

कोल्हापूर 02 डिसेंबर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant jadhav Passes Away) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं पार्थिव आज दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. राजकीय तसंच सामाजिक कार्यातून त्यांनी अनेकांच्या मनावर ठसा उमटवला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने केल्हापूर जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशीही फुटबॉललच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. गेल्या दीड वर्षात दोन वेळा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून ते बरे झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच आज हैदराबादेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

First published:

Tags: Kolhapur, Mla