Home /News /maharashtra /

गोविंद पानसरे हत्या प्रकरण, 'सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्याशिवाय आरोप निश्चित नको', कोर्टात नेमकं काय घडलं?

गोविंद पानसरे हत्या प्रकरण, 'सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्याशिवाय आरोप निश्चित नको', कोर्टात नेमकं काय घडलं?

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोप निश्चितीची सुनावणी आज पार पडली.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 27 जुलै : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी पार पडली. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच या प्रकरणी कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींपैकी तीन आरोपींना कोर्टात हजर केलं. पण सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती संशयित आरोपींच्या वकिलांनी केली. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या मागणीची दखल घेत पाच ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 ऑगस्टला होणार आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोप निश्चितीची सुनावणी आज पार पडली. या सुनावणीसाठी आज संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड हजर होते. पण सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सर्व आरोपी कोर्टात हजर केल्याशिवाय सुनावणी घेऊ नका. इतर संशयित आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या, अशी मागणी संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी कोर्टासमोर केली. त्यांच्या मागणीची दखल कोर्टाने घेतली. पटवर्धन यांच्या मागणीनंतर आता पुढील सुनावणी पाच ऑगस्टला होणार आहे. (पुण्यात हत्येचा भयानक थरार, तरुणावर तब्बल 35 वार, खतरनाक घटना सीसीटीव्हीत कैद) या सुनावणी दरम्यान वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी आरोपी वीरेंद्र तावडे याने केली. कोर्टाने त्याच्या मागणीची दखल घेतली. तसेच आता अटकेत असलेल्या सर्व संशयित आरोपींना 5 ऑगस्टला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे. नेमकं प्रकरण काय? कामगारासाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ भ्याड हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचारीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उपचारादम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या