मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा, पवारांचा नेता मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर!

कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा, पवारांचा नेता मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर!

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच त्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर दिसला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Shreyas

कोल्हापूर, 25 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच त्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर दिसला आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान वतीने आयोजित सुमंगलम पंचभौतिक महोत्सवाच्या बोधचिन्ह अनावरणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. या कार्यक्रमात शिंदेंसोबत व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए.वाय.पाटील होते.

ए.वाय.पाटील हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. यानंतर आता ए.वाय. पाटील शिंदेंसोबत दिसले आहेत.

पाटील हे मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीत काम करत असल्याने त्यांनी राधानगरी परिसरात आपलं स्थान निर्माण केलं होतं. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण यात मुश्रीफ यांना यश आलं नाही.

'मी हवामान बघतो अन्...', भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच अमोल कोल्हेंचा गुगली

माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करणारे ए.वाय. हे दुसरे जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. यापूर्वी लेमनराव निकम यांनीही 2009 मध्ये के. पी. पाटील यांची साथ सोडत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रकाश आबिटकर यांना साथ दिली होती.

First published:

Tags: Eknath Shinde, NCP