मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आता समोरून वार करणार, अनेक गोष्टी बाहेर काढणार', घाटगेंनी थोपाटले मुश्रीफांविरोधात दंड!

'आता समोरून वार करणार, अनेक गोष्टी बाहेर काढणार', घाटगेंनी थोपाटले मुश्रीफांविरोधात दंड!


मला किरीट सोमय्यांच्या मागे लापायची गरज नाही. मुश्रीफ यांना रात्री झोपतानाही समरजीत घाटगे दिसत आहे. ईडीला सामोरे जायचे नव्हते म्हणून मुश्रीफ मुंबईला गेले का?

मला किरीट सोमय्यांच्या मागे लापायची गरज नाही. मुश्रीफ यांना रात्री झोपतानाही समरजीत घाटगे दिसत आहे. ईडीला सामोरे जायचे नव्हते म्हणून मुश्रीफ मुंबईला गेले का?

मला किरीट सोमय्यांच्या मागे लापायची गरज नाही. मुश्रीफ यांना रात्री झोपतानाही समरजीत घाटगे दिसत आहे. ईडीला सामोरे जायचे नव्हते म्हणून मुश्रीफ मुंबईला गेले का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 14 जानेवारी : 'मी शाहूंच्या रक्ताचा वंशज आहे. मला समोरून वार करायची सवय आहे. मला मुश्रीफांसारखे पाठीत वार करत नाही. येत्या काळात मुश्रीफांच्या अनेक गोष्टी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढणार आहे, असा इशाराच भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना दिला.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई मागे घाटगे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला आज घाटगेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.

'मला मुश्रीफांच्या घरावर पडलेल्या छाप्याची माहिती माध्यमातून मिळाली. मी पत्नीसह त्यावेळी कामानिमित्त दिल्लीत होतो. मुश्रीफांच्या घरावर तीन वेळा रेड पडली. यामध्ये त्यांची ठरलेली स्क्रिप्ट असते. माझ्यावर आरोप, भाजपची ऑफर, कार्यकर्त्यांना आवाहन, संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना रस्त्यावर उतरवणे अशी रिटन स्क्रिप्ट आहे.

(सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं)

'मी शाहूंच्या रक्ताचा वंशज आहे. मला समोरून वार करायची सवय आहे. मला मुश्रीफांसारखे पाठीत वार करत नाही. येत्या काळात मुश्रीफांच्या अनेक गोष्टी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढणार आहे, असा इशाराच घाटगे यांनी मुश्रीफ यांना दिला.

सत्ताबदलानंतर पुरुषार्थ असेल तर माझ्यापेक्षा जास्त काम करा असं ते म्हणाले होते. मुश्रीफ यांच्यामध्ये मर्दांगी असेल तर जात धर्माआड लापायची गरज कायय अनेकांवर किरीट सोमय्यांनी आरोप केले कोणीही जातीच्या आड लपले नाहीत. जातीच्या मागे लपून पुरोगामी आमदार म्हणतात. मुश्रीफ हे एक नंबरचे जातीयवादी आहेत हे त्यांनी कबूल केले, अशी टीकाही घाटगेंनी केली.

(अजित पवार घेणार पंढरपूरचा बदला, पुण्यातील पोटनिवडणुकीत भाजपला देणार टक्कर?)

'नवाब मलिक आणि मुश्रीफांना टार्गेट केले म्हणतात पण मुश्रीफांच्यावर काय आरोप आहेत हे मुश्रीफांनी लक्षात घ्यावे. दहशतवादी कनेक्शन नवाब मलिकांवर आरोप आहेत. त्यांना क्लीन चिट देण्याचे प्रेम मुश्रीफ का व्यक्त करतात मलिक आणि तुमचे कनेक्शन काय हे जाहीर करा

मला किरीट सोमय्यांच्या मागे लापायची गरज नाही. मुश्रीफ यांना रात्री झोपतानाही समरजीत घाटगे दिसत आहे. ईडीला सामोरे जायचे नव्हते म्हणून मुश्रीफ मुंबईला गेले का? जी गोष्ट मला माहित नाही. ती माझ्या कार्यकर्त्याला कशी माहीत असणार आहे. मुश्रीफांना आता स्वप्नात कार्यकर्ते दिसतात. 25 वर्षाच्या आमदारांना माझ्या कार्यकर्त्याची दखल घ्यावी लागते, असा टोलाही घाटगे यांनी लगावला.

First published: