कोल्हापूर, 19 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली आहे. शासकीय बंगल्यावर दोघांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास 15 ते वीस मिनिटे चर्चा झाली. दरम्यान पार्थ पवार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीवरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर -
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामतीमधील अॅग्रो त्यांच्याकडे आहे. तसेच रोहित पवार आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थ पवार यांची असेल, असेही ते म्हणाले. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, याबाबतचे शल्य त्यांच्या मनात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही निवडणूक आली की कामाला लागत नाही. आमची तयारी अगोदरपासून सुरू आहे. त्यामुळे बारामतीसह यावेळी सर्व जागा जिंकू, असा विश्वासही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी आज मुंबईत, वाहतुकीत कोणते बदल झाले आहेत ते वाचा
पार्थ पवार यांनी आज अचानक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र काही खासगी कामासाठी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचा खुलासा पार्थ पवार यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.