Home /News /maharashtra /

VIDEO : कार्यकर्त्यांचा अतिउत्साह एसटी बसच्या टपावर चढून डान्स, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर भाजपचं कोल्हापुरात सेलिब्रेशन

VIDEO : कार्यकर्त्यांचा अतिउत्साह एसटी बसच्या टपावर चढून डान्स, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर भाजपचं कोल्हापुरात सेलिब्रेशन

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर विजय मिळाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आज पहिल्यांदाज कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 12 जून : सिकंदर राजा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या राजाने जग जिंकण्याची शपथ घेतली होती. सिकंदर म्हणजे ग्रीसचा राजा अलेक्झांडर. या राजाने कोणतीच लढाई हारली नव्हती. तो प्रचंड शूर होता. या राजाला आपल्या देशात सिंकदर अशा नावानं ओळखलं जातं. सिकंदराच्या नावावरुन बॉलिवूडमध्ये एक गाणंदेखील आहे, या गाण्यात कोणतीही पैज किंवा संघर्ष जिंकणाऱ्या व्यक्तीची तुलना सिंकदरासोबत करण्यात आली आहे. याच गाण्यावर आज भाजपचे (BJP) कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये (Kolhapur) थिरकताना दिसले. या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा नेता जिंकून आल्याचा उत्साह होता. राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याच उत्साहातून कोल्हापुरात महाडिकांची जंगी रॅली काढण्यात आली आहे. या दरम्यान कोल्हापुरात एका चौकाजवळ कार्यकर्त्यांचा अतिउत्साह बघायला मिळाला. काही कार्यकर्ते हे आज 'वो सिकंदर है जितका...' या हिंदी गाण्यावर थेट चालत्या मालवाहू ट्रकवर थिरकताना दिसली. फक्त ट्रकच नाही तर एसटी बसवरही काही कार्यकर्ते थिरकताना दिसली. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर विजय मिळाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आज पहिल्यांदाज कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशा वाजवत, गुलालाची उधळण करत उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. विशेष म्हणजे काही कार्यकर्त्यांनी थेट एसटी बसवर चढून सेलिब्रेशन केलं. तर काही कार्यकर्त्यांनी मालवाहू ट्रकवर चढून डान्स केला. कार्यकर्त्यांचा हा अतिउत्साह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक, प्रवीण दरेकरांचा दोन वेळा अडवला ताफा, बीडमध्ये राडा) दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या विजयानिमित्ताने कोल्हापुरात जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून महाडिकांची जंगी रॅली काढण्यात आली आहे. यावेळी धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना क्रेनमध्ये बसवून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी फेटा फेकला. यावेळी डिझेवर गाणे वाजत आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड डान्स सुरु आहे. हवेत गुलाल उधळला जातोय. राज्यसभेच्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. प्रचंड अटीतटीची ही लढत होती. या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेना आणि भाजपसाठी राज्यसभेची सहाव्या जागेची ही निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे भाजपसाठी हा विजय खास आहे. त्यामुळे भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या