Home /News /maharashtra /

चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, आई सरस्वती पाटील यांचं निधन

चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, आई सरस्वती पाटील यांचं निधन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज निधन झालं आहे.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 24 जुलै : आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आपलं सारं काही, आपलं सर्वस्व. आईचं महत्त्व शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्यच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हटलं जातं. ते अगदी खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आईची साथ आणि आशीर्वाद असणं जास्त आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली (सातारा, आजरा) असा परिवार आहे. ('मनसेतही वादविवाद'; महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचा गौप्यस्फोट) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. सरस्वती पाटील यांचं संभाजीनगर इथं राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या पार्थिवारवर आज रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्यची माहिती मिळत आहे. सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी सरस्वती माईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil

    पुढील बातम्या