Home /News /maharashtra /

rajya sabha election : कोल्हापुरात सेनेचं ठरलं, तर भाजपही धनंजय महाडिकांना उतरवणार मैदानात?

rajya sabha election : कोल्हापुरात सेनेचं ठरलं, तर भाजपही धनंजय महाडिकांना उतरवणार मैदानात?

विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे

    ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 24 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेनं छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje)  यांना ऑफर दिली मात्र त्यांनी नाकराली आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून शिवसेना जिल्ह्याध्यक्षांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर भाजपने आता धनंजय महाडिक यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. भाजपने आता संख्याबळ नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून  पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर भाजपकडून आता धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. (तारकर्ली बोट दुर्घटनेत सेना आमदाराच्या पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, आई-बहिण वाचली) विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे. ('बोगस बियांणाचा पुरवठा करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाका') तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत.  संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. पण, शिवसेनेनं दुसरा उमेदवार उतरवण्याचा घाट केला आहे. संजय पवार यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आह.  तर आता भाजपने तिसरी जागा लढवण्याची खेळी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या