Home /News /maharashtra /

'गली गली मै शोर है' संतप्त शिवसैनिक धडकले बंडखोर खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर, घोषणाबाजीने परिसर दणाणला

'गली गली मै शोर है' संतप्त शिवसैनिक धडकले बंडखोर खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर, घोषणाबाजीने परिसर दणाणला

धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

    कोल्हापूर, 25 जुलै :  शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटात (shinde group) सामील झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. आज कोल्हापूरमध्ये खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. धैर्यशील मानेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला आहे. कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली. त्यामुळे आज संतापलेल्या शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला.  यावेळी 'गली गली मै शोर है, माने चोर है' अशा घोषणा देण्यात आल्या. मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकआक्रमक झाले आहेत. तर, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर लढवली पण त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून घाणीत उडी मारली. त्यांच्या हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडूण यावे, असं शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी थेट आव्हान माने यांना दिले आहे. (BREAKING : सलमान खाननंतर आता कॅटरिना आणि विकीला जीवे मारण्याची धमकी) माने हे खरे वारसदार असतील तर त्यांनी शिवसेनेत गद्दारी करून बाहेर पडले तसे त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. खासदार गटाने दोन वेळा गद्दारी केली यांची लायकी नसताना त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली पण त्यांनी आपली औकाद दाखवली, अशी टीकाही जाधव यांनी केली. शिवसैनिकांनी करून दिली रुग्नवाहिकेला वाट! खासदार धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक कोल्हापूर शहराच्या मुख्य चौकात एकवटले. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाली. यादरम्यान एक रुग्णवाहिका आली रुग्णवाहिका आल्यानंतर शिवसैनिकांन मोर्चा थांबवून रुग्नवाहिकेला वाट करून दिली. आपल्या  मोर्चामुळे कोणताही भंग होऊ नये यासाठी शिवसैनिकांनी शिस्तीचे पालन केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. धैर्यशील मानेंचं दिल्लीतून स्पष्टीकण संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे धैर्यशील माने हे दिल्लीत आहे. शिवसैनिकांनी मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर धैर्यशील माने यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं. 'शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का घडलं? कशामुळे घडलं? यासाठी त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी एक शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हा आपलेच बंधू-भगिनी आहेत व त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य आहे. अधिवेशन असल्यामुळे मी दिल्लीमध्ये आहे. मतदारसंघात आल्यानंतर वस्तुस्थितीबाबत, माझ्या भूमिकेबाबत मी प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करेन. तोवर संयम राखून मतभेद होणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार किंवा प्रतिवाद होता कामा नये तसेच प्रशासनानेही मोर्च्याला सहकार्य करावे, असं पत्र लिहून माने यांनी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या