मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Agniveer Recruitment : मोफत अन्नछत्र ते वाहतुकीत बदल! अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर सज्ज

Agniveer Recruitment : मोफत अन्नछत्र ते वाहतुकीत बदल! अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर सज्ज

सैन्यदलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे.

सैन्यदलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे.

सैन्यदलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 23 नोव्हेंबर :   सैन्यदलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्याीठाच्या मैदानात ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथील मिळून एकूण 90 हजार तरुणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या एकाही उमेदवाराची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येकी 100 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल, त्याप्रमाणे उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येते. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतात.

काय आहे प्रक्रिया?

कोल्हापुरात 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील एकूण 1553 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. ही भरती पुढे 20 दिवस म्हणजेच 11 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. यातील अग्निवीरसाठीची भरती प्रक्रिया 6 डिसेंबर पर्यंत असेल. तर पुढं 7 डिसेंबरपासून ते 11 डिसेंबरपर्यंत सैन्यातील नर्सिंग विभागासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अशी तब्बल 20 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या परिसरात लष्कराचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. यानंतर पहिल्या टप्प्यात वजन, उंची, छाती अशी शारीरिक चाचणी केली जाईल. त्यानंतर धावणे, लांबउडी व इतर क्षमतेच्या चाचण्या देखील होतील. जानेवारी महिन्यात उत्तीर्ण झालेल्यां सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. यातून अंतिम निवड यादी निश्‍चित करण्यात येणार आहे. या ठिकाणी मुख्य भरती अधिकारी अधिकारी विक्रमादित्य सिंह पाल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 150 पेक्षा जास्त अधिकारी उमेदवारांची चाचणी घेत आहेत.

Highlining : तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

चोख नियोजन

जिल्हा प्रशासनाकडून या भरतीसाठी आलेल्या मुलांसाठी माळावरील एका बाजूला 35 स्वच्छतागृहांची बांधणी केली आहे. पाण्याचे टँकर आणून ठेवले आहेत. 'मुलांचे प्रत्येकी 100 जणांचे ग्रुप केले आहेत. यानंतर ही मुले शिस्तबद्ध पद्धतीने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य मैदानावर नेलं जातं,', अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी दिली.

वाहतूक मार्गात बदल

या भरती प्रक्रियेच्या आसपासचा परिसर खाजगी वाहनांसाठी प्रतिबंधित ठेवण्यात आला आहे. उमेदवारा व्यतिरिक्त अन्य कोणालाही याठिकाणी येण्यास मनाई आहे. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे यानिमित्ताने या परिसरात 21 नोव्हेंबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये किंवा नागरिकांनाही त्रास होऊ नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

रोजगार मेळाव्यात मोदींकडून 71,000 Appointment letter, ‘या’ शहरातील तरुणांना मिळाली नोकरीची संधी

मोफत अन्नछत्र

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कोल्हापुरातील जीवनमुक्ती सेवा संस्थेतर्फे (व्हाईट आर्मी) प्रत्येक दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अन्नछत्राची सोय केली आहे. गेल्या 15 वर्षांपासून सैन्य भरतीवेळी आलेल्या उमेदवारांना व्हाईट आर्मीमार्फत मोफत अन्नछत्र चालविले जाते. याचबरोबर अन्य स्वयंसेवी संस्था देखील भरती साठी आलेल्या उमेदवारांना सहाय्य करत आहेत.

First published:

Tags: Career, Indian army, Kolhapur, Local18