Home /News /maharashtra /

'जे गद्दार आमचे झाले नाही, ते तुमचे तरी होणार का?'; बंडखोरांवर पुन्हा बरसले आदित्य ठाकरे

'जे गद्दार आमचे झाले नाही, ते तुमचे तरी होणार का?'; बंडखोरांवर पुन्हा बरसले आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) सवाल केला, की जे गद्दार आमचे झाले नाही, ते तुमचे तरी होणार का? यासोबतच तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत असा सवालही आदित्य यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर 02 ऑगस्ट : शिवसेना आणि अपक्ष अशा 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, शिवसेनेच्या अडचणी इथेच थांबल्या नाहीत, तर या बंडानंतरही अनेक खासदार पदाधिकारी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या समर्थनात पुढे आले. अशात शिवसेना वाचवण्यासाठी आता आदित्य ठाकरेंनी राज्यभर दौरा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे अने जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये जात शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कुठे अडकला? मुख्यमंत्री शिंदेंचं अजितदादांना प्रत्युत्तर यादरम्यान आदित्य ठाकरे बंडाखोरांवर सडकून टीकाही करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी सवाल केला, की जे गद्दार आमचे झाले नाही, ते तुमचे तरी होणार का? यासोबतच तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत असा सवालही आदित्य यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, यांची गद्दारी आमच्या कानावर येत होती. मात्र, शपथ घेऊन हे आम्ही गद्दारी करणार नसल्याचं म्हणाले आणि शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलं. परंतु, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं हे सिद्ध करायचं आहे म्हणून मी बाहेर पडलो, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आता कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेला याठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी बोलताना त्यांनी बंडखोरांवर टीका केली
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Shivsena

    पुढील बातम्या