Home /News /maharashtra /

propose with hoarding : कोल्हापूच्या सौरभने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सांगलीच्या उत्कर्षासोबत केला ‘करेक्ट कार्यक्रम’, हायवेवरील होर्डिंग्जची जोरदार चर्चा

propose with hoarding : कोल्हापूच्या सौरभने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सांगलीच्या उत्कर्षासोबत केला ‘करेक्ट कार्यक्रम’, हायवेवरील होर्डिंग्जची जोरदार चर्चा

होर्डिंग्ज लावून अनोखे प्रपोज (propose with hoarding) करणाऱ्या प्रेमवीराची सध्या कोल्हापुरात (Kolhapur) जोरदार चर्चा सुरू आहे.कोल्हापूर सांगली रस्त्यावर लावलेले हे होर्डिंग्जकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

  ज्ञानेश्वर साळुंखे (कोल्हापूर), 19 मे : होर्डिंग्ज लावून अनोखे प्रपोज (propose with hoarding) करणाऱ्या प्रेमवीराची सध्या कोल्हापुरात (Kolhapur) जोरदार चर्चा सुरू आहे.कोल्हापूर सांगली (Kolhapur sangli highway) रस्त्यावर लावलेले हे होर्डिंग्जकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र ते कोणी आणि का लावले याबाबत मात्र खात्रीशीर माहिती नसल्याने सर्वाना उत्सुकता होती. कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरने सांगलीतल्या उत्कर्षासाठी हे होर्डिंग्ज लावत त्यावर उत्कर्षा marry मी असे लिहत थेट लग्नाची मागणी घातली. पोस्टर जवळच तिला बोलवून घेऊन त्याने प्रपोजही केले. या दोघांच्या प्रेमाला घरच्यानीही होकार दिला असून दोघे आता 27 मे रोजी लग्न करणार आहेत. मात्र त्यांच्या अनोख्या लग्नाच्या मागणीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

  दरम्यान यापुर्वी कोल्हापुरात आमचं ठरलयं, गुड न्यूज अशा आशयाचे पोश्टर लागले होते यातचं उत्कर्षा marry मी हे नवीन प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आमचं ठरलयं आणि टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच ह्या टॅगलाईन जोरदार चालतात यामुळे कोल्हापूरकर सौरभ कसबेकरने आमचं ठरलयं म्हणत सांगलीच्या उत्कर्षाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  (हे ही वाचा : रणबीरला सोडून आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली परदेशी, वाचा काय म्हणाली नणंद रिद्धिमा)

  कोल्हापुरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीची उत्कर्षा हे  2017 पासून बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेंव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेंव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे विचारल्यानंतर त्याने आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले. 

  त्यामुळे कसबेकर यांनी उत्कर्षाच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभ च्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही होय नाही हेच सुरू होते. उत्कर्षाकडून सुद्धा अध्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर शेवटी घरचे सुद्धा तयार झाले. 

  (हे ही वाचा : आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात, नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला)

  मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे तिला प्रपोज केले. कोल्हापूर सांगली हायवेवरील अतीग्रे येथे रस्त्याच्या बाजूला असलेले 50*25 आकाराच्या होर्डिंगवर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एव्हढेच लिहून त्याने अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.

  येत्या 27 मे रोजी दोघांचे लग्न सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आनंदी असून आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रपोज करून लग्न होत असल्याचा शिवाय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात याची चर्चा सुरू असल्याचाही आनंद होत असल्याचे दोघांनी म्हटले आहे. दरम्यान, दोघेही आता एमटेक सुद्धा करत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur

  पुढील बातम्या