ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 30 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या समोरच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी या तरुणीची विचारपूस न करताच निघून गेले.
कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. परशुराम नामदेव कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. त्याने जिल्हाधिकारी दालनासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्याची मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने, परशुराम कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, तिथे हजर असलेल्या पोलिसांनी लगेच झडप घालून त्याला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घटना घडूनही पाटील यांनी आत्मदहन करणाऱ्या परशुराम कांबळे या तरुणाची साधी विचारपुसही केली नाही. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पाटील हे आपला ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम कांबळे याला पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.
(अण्णा हजारेंचं केजरीवालांना पत्र, त्या निर्णयाबाबत व्यक्त केली नाराजी)
'आम्ही सर्वपत्र व्यवहार केले, अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आहे. पण अजूनही न्याय मिळाला नाही. सगळी कागदपत्र आहे माझ्याकडे, पण तरीही पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही भेटलो होतो. मंत्रालयातही अनेक चक्करा मारल्या. आमच्याकडे पैसे नाही, त्यामुळे मुंबईला जाऊ सुद्धा शकत नाही, अशी व्यथाच या तरुणाने मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news