कागल, 11 मार्च : आज 11 वाजता बारावीचा (12th Board Exam) पेपर होता. गणेश कांबळे त्याची तयारी करीत होता. कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही हे त्याला माहीत होतं. वडिल महादेव कांबळे नगरपालिकेत सफाई कामगार होते. वडिलांची मेहनत तो दररोज पाहत होता. तेवढ्यात सकाळी अचानक वडिलांच्या निधनाचं कळालं आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
'भरपूर अभ्यास कर... मोठा हो', असं म्हणत नेहमीच प्रोत्साहन देणारे वडील आपल्याला सोडून गेले ही भावनाच त्याला सहन झाली नाही. त्यात आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा..12 वीचा पेपर. मात्र तरीही त्याने धीर सोडला नाही. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख मनावर घेऊन ते परीक्षा केंद्रावर गेला आणि पेपर दिला. पेपरातील शेवटचा प्रश्न सोडवताच त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. परीक्षा देऊन आल्यानंतर त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. ही दुर्देवी घटना आहे कागल तालुक्यातील मुरगूडची. (Kolhapur News)
हे ही वाचा-Kolhapur: एकुलती एक मुलगी घरातून निघून गेली अन्.; जन्मदात्यानं उचललं टोकाचं पाऊल
महादेव कांबळे हे मुलाच्या शिक्षणासाठी खूप धडपड करीत होते. त्यामुळे नोकरी करता छोटा मोठा व्यवसाय करून ते संसाराचा गाडा ओढत होते. मुलांना कसलीच कमतरता भासू नये हा त्यामागील प्रयत्न. वयाच्या 64 व्या वर्षी गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांना तातडीने कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशसाठी हे दु:ख खूप मोठं आहे. तो शिवराज कॉलेजमध्ये 12 वीत शिकतो.
सकाळी त्याचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. पेपरला जाण्यापूर्वीच वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो सुन्न झाला. दरम्यान कॉलेजमधील शिक्षकांनी त्याला धीर दिला आणि पेपर देण्यास सांगितलं. तीन तास त्याने पेपर सोडवला. तोपर्यंत वडिलांचे अंत्यसंस्कार थांबवून ठेवण्यात आले. परीक्षा देऊन आल्यानंतर वडिलांच्या चितेवर डोकं ठेवून तो धाय मोकलून रडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.