कोल्हापूर, 08 डिसेंबर: कोल्हापुरातील (Kolhapur) कळंबा नाक्याजवळील साई मंदिराजवळ एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका दुर्दैवी घटनेत 62 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा भयावह अंत झाला आहे. संबंधित मृत वयोवृद्ध हे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका ट्रकच्या चाकाजवळ बसले होते. दरम्यान, ट्रकचालकाने ट्रक पुढे नेल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू (old man died in truck accident) झाला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून ट्रकचालकाला ताब्यात घेतलं आहे.
रमेश आदिनाथ जबडे असं मृत पावलेल्या 62 वर्षीय वयोवृद्धाचं नाव असून ते कोल्हापुरातील कळंबा रोड परिसरातील हडको कॉलनीतील रहिवासी होते. तर रामचंद्र पाटील या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक पाटील यांनी सोमवारी दुपारी फराळे येथील राधा शुगर्स कारखान्यातील बगॅस भरला होता. बगॅस घेऊन पाटील हे गगनबावडाच्या दिशेनं जात होते.
हेही वाचा-उठता बसता पत्नीकडून सुरू होता छळ; पुण्यातील तरुणानं केला हृदयद्रावक शेवट
दरम्यान, कळंबा नाक्याजवळील साई मंदिरानजीक आल्यानंतर पाटील यांना चहा पिण्याची तलप झाली. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून चहा पिण्यासाठी गेले. काही वेळाने ते चहा पिऊन आले आणि ट्रक सुरू केला. यावेळी ट्रकच्या डाव्या बाजूला चाकानजीक बसलेल्या जबडे यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. मृत जबडे हे ट्रकच्या डाव्या बाजूला बसल्याने त्यांना ते निदर्शनास आले नाही. पण ट्रक चालकाच्या चहाची तलप एका वयोवृद्धाच्या जीवावर बेतली आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा-लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, काही अंतर जाताच महिलेसोबत घडला भयावह प्रकार
मृत जबडे हे दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज दुपारी साई मंदिर येथे दर्शनासाठी येत होते. सोमवारी देखील ते नेहमी प्रमाणे साई मंदिरात गेले. देवदर्शन झाल्यानंतर मृत जबडे हे चौकातील एका गाड्यावर पाणी प्यायले आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकाखाली बसले होते. यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur