Home /News /maharashtra /

कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, विचित्र तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, विचित्र तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली.

    कोल्हापूर 02 जुलै : कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे (4 Died in Road Accident at Kolhapur). kolhapur crime : जमिनीच्या तुकड्यासाठी हुकूमशाही? लमान वसाहतीला मध्यरात्री लावली आग मृतांमध्ये 11 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमध्ये मृत्यू झालेले चारही जण बंगळुरू येथील रहिवासी होते.या अपघातानंतरचे घटनास्थळावरील काही व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतं. भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे झालेल्या या विचित्र अपघातात चार जण ठार झालेत आहेत. आज पहाटे हा अपघात घडला. एक्सेल तुटल्याने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला महिंद्रा कार जाऊन धडकली तर कारच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रकही अपघातग्रस्त कारला मागून धडकला. या विचित्र अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सर्व बंगळुरू येथील एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान ४-५ दिवसांपूर्वी कोल्हापुरामध्ये आणखी एक भीषण अपघात झाला होता. यात मोटारसायकल आणि कंटनेरचा गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ भीषण अपघात झाला होता. यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव उमा मार्तंड जरळी (वय 25) असं होतं. तरुणी महागाव येथील रुग्णालयात सेवा देत होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Kolhapur, Major accident

    पुढील बातम्या