कोल्हापूर, 29 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे याठिकाणी एका विवाहितेचा संदिग्धावस्थेत मृतदेह ( married woman Suspicious death) आढळला आहे. पतीने दुसरं लग्न करण्याची धमकी आणि औषधाचं दुकान टाकण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत महिला आपल्या सासरच्या घरी जनावरांच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे विवाहितेच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झालं आहे.
माधुरी सुरेंद्र आर्दाळकर असं मृत पावलेल्या 27 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. माधुरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती सुरेंद्र जयसिंग आर्दाळकर याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सुरेंद्र आपल्या पत्नीला घेऊन पुण्यातील निगडी याठिकाणी राहत होता. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी दोघंही पुण्याहून आपल्या गावी कौलगे याठिकाणी येत होते. यावेळी कबनूर येथे वडिलांना भेटून कौलगेला जाऊ असं माधुरीनं सुरेंद्रला सांगितलं. पण सुरेंद्र तिला थेट कौलगेला घेऊन गेला.
हेही वाचा-वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का
यामुळे नाराज झालेल्या माधुरीनं कौलगे येथे सासरच्या घरी गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. तसेच पायाखाली घेतलेला प्लास्टिकचा टूलही बाजूला पडलेला आढळला आहे. परंतु माधुरीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत माधुरी यांच्या फिर्यादीनुसार गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे.
हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग
याबाबत अधिक माहिती देताना, मृत माधुरी यांचे वडील भैरू विठोबा ऱ्हाटवळ यांनी सांगितलं की, माझी मुलगी मला नेहमी मराठीतून संदेश करते. पण मृत्यूच्या दिवशी तिने इंग्रजीतून संदेश केला आहे. पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी माधुरी यांच्या मोबाइलवरून मेसेज करण्यात आला आहे. पण माधुरीचा मृत्यू रात्री एक ते पहाटे साडेपाचच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विवाहितेच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास गडहिंग्लज पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur