राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना घडलीये

  • Share this:

15 नोव्हेंबर : कोल्हापूरमध्ये एका वृद्ध महिलेनं राहत्या घरात  स्वत:ची चिता रचून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडलीये.कलव्वा कांबळे असं मृत महिलेचं आहे.

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना घडलीये. कलव्वा कांबळे ह्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. आपले काम आपणच करून स्वतःला लागेल तेवढे अन्न तयार करून खात होत्या. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी स्वतः चिता रचली आणि अंगाभोवती साड्या गुंडाळून पेटवून घेतले. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. वृद्ध महिला नेहमीप्रमाणे घराबाहेर आली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

First published: November 15, 2017, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading