मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...आणि नांगरे पाटलांनी चिमुरड्याला बनवलं आयपीएस!

...आणि नांगरे पाटलांनी चिमुरड्याला बनवलं आयपीएस!

 विश्वास नांगरे पाटील यांनी पोषण प्रोजेक्ट अंतर्गत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते

विश्वास नांगरे पाटील यांनी पोषण प्रोजेक्ट अंतर्गत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते

विश्वास नांगरे पाटील यांनी पोषण प्रोजेक्ट अंतर्गत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते

कोल्हापूर, 30 आॅगस्ट : विश्वास नांगरे पाटील यांचं नावाच महाराष्ट्रासाठी पुरेसं आहे. नांगरे पाटील यांची कारवाई असो अथवा त्यांचे विचार हे ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांचा चाहता वर्ग आहे. कोल्हापूरमधला त्यांच्या कार्यक्रमातला हा व्हिडिओ नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोषण प्रोजेक्ट अंतर्गत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. यावेळी व्यासपीठावर चिमुरड्यांनी जोरदार भाषण ठोकली. यात एका चिमुरड्याने आपल्याला नांगरे पाटील यांच्यासारखं पोलीस होण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. एका विशेष घटकातील या मुलाचं हे स्वप्न पाहून नांगरे पाटील सुद्धा भारावून गेले. आणि ज्यावेळी हा चिमुरड्या पोषणद्रवे वितरित करत असताना व्यासपीठावर आला तेव्हा नांगरे पाटलांनी आपली टोपी त्याच्या डोक्यावर घालून त्याचा सत्कार केला. आपली कॅप त्यांना परिधान करत त्याच्या स्वप्नांना एकाप्रकारे नागरे पाटलांनी बळ दिलं. हा किस्सा नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून शेअर केलाय.
First published:

Tags: Kolhapur, Kolhapur news, Vishvas nangre patil, विश्वास नांगरे पाटील

पुढील बातम्या