Home /News /maharashtra /

कोल्हापूरकरांनी आणखी एका वीर सुपुत्राला गमावले, ड्युटीवर असताना जवानाने सोडले प्राण

कोल्हापूरकरांनी आणखी एका वीर सुपुत्राला गमावले, ड्युटीवर असताना जवानाने सोडले प्राण

भगवान साळोखे हे 123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C.R.P.F) मध्ये बालाघाट मध्य प्रदेश येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूर, 11 डिसेंबर : सीमारेषेवर दहतवाद्यांशी सामना करत असताना ऐन दिवाळीच्या सणात कोल्हापूरच्या (Kolhapur) जवानाला वीरमरण आल्याची घटना ताजी असताना आज आणखी एका सुपुत्राला कोल्हापूरकरांनी गमावलं आहे. कर्तव्य बजावत असताना चरण तालुक्यातील जवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चरण तालुका( शाहूवाडी) येथील राहणारे अमित भगवान  साळोखे (वय 30) यांचं बालाघाट मध्य प्रदेश येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी दिनांक  10 डिसेंबर रोजी निधन झाले. भगवान साळोखे हे ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. SWIGGY चा नवा प्लॅन! कोरोनाचा फटका बसलेल्या या वर्गाला जोडणार, मिळेल रोजगार भगवान साळोखे हे 123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C.R.P.F) मध्ये  बालाघाट मध्य प्रदेश येथे कॉन्स्टेबल  म्हणून कार्यरत होते. ते 2009 ला केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी  त्यांचे घरी व गावात समजताच या परिसरात शोककळा पसरली.  अमित यांचे दहावीपर्यंत शिक्षण हे रामगिरी विद्यालय चरण येते तर अकरावी बारावी शिक्षण सरूड कॉलेज येथे झाले होते. त्यांचे पश्चात आई वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी, बहीण ,चार चुलते असा मोठा परिवार आहे. मागील महिन्यात महाराष्ट्राने गमावले 3 जवान दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या सणात महाराष्ट्रातील आणखी दोन तरुण जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. या गोळीबारात भारताचे 5 जवान शहीद झाले होते. तर 3 नागरिक ठार झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. व्वा क्या बात है! सलूनमध्ये स्वत:च्याच हातानी कापले केस, VIDEO पाहून व्हाल हैराण कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. या दोन्ही जवानांवर त्यांच्या मुळगावी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर याच महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी जम्मू काश्मिरमधील श्रीनगर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचे जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या