Home /News /maharashtra /

Kolhapur Shiv sena : मी एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा, तू गुंड असशील मी सुशिक्षित गुंड राजेश क्षीरसागर यांचे माजी शिवसेना प्रमुखाला थेट आव्हान

Kolhapur Shiv sena : मी एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा, तू गुंड असशील मी सुशिक्षित गुंड राजेश क्षीरसागर यांचे माजी शिवसेना प्रमुखाला थेट आव्हान

एकनाथ शिंदेंचा (eknath shinde in guwahati) पठ्ठा आहे. असा इशारा माजी आमदार राजेश क्षीरसागर (former mla rajesh kshirsagar) यांनी माजी शिवसेना जिल्हा प्रमुखाला दिला.

  कोल्हापूर, 26 जून : आपण कट्टर शिवसैनिक (Shiv sena) आहोत. मात्र, या घडामोडींचा गैरफायदा घेऊन काही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोल्हापुरातील (kolhapur shiv sena) एक गुंड (पण त्याच्यात काही दम नाही) शिवसेनेचे पोस्टर फाडत आहे. माझा त्याला जाहीर इशारा आहे, तू गुंड आहेस, तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर नाही तर माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडेल तेव्हा तुझी पळताभुई थोडी होईल, हा एकनाथ शिंदेंचा (eknath shinde in guwahati) पठ्ठा आहे. असा इशारा माजी आमदार राजेश क्षीरसागर (former mla rajesh kshirsagar) यांनी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले (shiv sena ravikiran ingavle) यांना दिला आहे.

  राजेश क्षीरसागर गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाल्यानंतर कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटले. काही शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पोस्टरवरचा राजेश क्षीरसागर यांचा फोटो फाडून टाकला. त्यामुळे संतप्त क्षीरसागर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे.

  हे ही वाचा : 'पवारसाहेबांनी अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले; बंडखोर परत येणारच', राष्ट्रवादीच्या आमदाराला विश्वास

  शिवसेनेसाठी गेल्या 36 वर्षांत जेवढे मी योगदान दिले आहे, तेवढे कोणी दिलेले नाही. शिवसेना आपण घडवलेली आहे. 2004 साली नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा शिवसेना संपली होती. तेव्हा आपण काय केले ते सर्वांना माहीत आहे. आपले पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की, कोणी वैयक्तिक द्वेषाचा फायदा घेत असेल, शिवसेनेचे नुकसान होत असेल तर त्यांना पाठीशी घालू नका. आपण शिवसेना सोडलेली नाही, तर आपण शिवसेनेतच आहोत. शेवटचा इशारा देतो की, जर बघायचे असेल तर बघा. राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. सोडणार नाही, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

  काय म्हणाले रविकिरण इंगवले…

  जयप्रभा स्टुडिओ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. हा स्टुडिओ खरेदीचा व्यवहार क्षीरसागर यांनी रद्द करावा; अन्यथा त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

  जयप्रभा स्टुडिओची जागा गिळंकृत करणाऱ्या कोल्हापूरच्या व्यापारी लोकप्रतिनिधीने आपल्या मुलांच्या नावावर केलेला हा व्यवहार अंगलट आला तेव्हा मुलांनी केलेला व्यवहार मला माहीत नव्हता, असा विश्वामित्री पवित्रा घेतला. मुलांचे भांडवल प्रत्येकी फक्त १३ हजार रुपये आहे, असे जाहीर केले. राज्य शासनाने हेरिटेज वास्तू घोषित करूनसुद्धा कोल्हापूरच्या सांस्कृतिक मुळावर हुकूमशाहीच्या माध्यमातून बेमुर्वतखोरपणे जागा विकत घेणाऱ्या क्षीरसागर यांना त्यांच्या पराक्रमी मुलांचे गुंतविलेले प्रत्येकी १३ हजार रुपये आम्ही स्वखर्चाने परत करत आहोत. स्वतःचे भांडवल मिळाल्यानंतर या व्यवहारातून त्यांना बाहेर पडायला काहीच अडचण नाही. जयप्रभाची जागा जोपर्यंत चित्रपट व्यवसायाला व चित्रीकरणाला मिळत नाही, तोपर्यंत हा लढा शेवटपर्यंत चालू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

  हे ही वाचा : गुवाहाटीमध्येही 'रात्रीस खेळ चाले', शिंदेंच्या भेटीला आसामचे मंत्री हॉटेलवर प्रकटले!

  शिवसेनेचा निष्टावान आणि कट्टर अशी बिरुदावली मिरवत संघटनेच्या दहशतीवर स्वतःचे दुकान थाटलेल्या क्षीरसागर यांची गद्दारी जनतेच्या लक्षात असून, त्यांनी स्वतःची उरली सुरली अब वाचविण्यासाठी १३ हजार रुपये घेऊन जयप्रभातून आपली मालकी रद्द करावी. गेले तीन महिने आंदोलन करणाऱ्या चित्रपट व्यावसायिकांना जर न्याया मिळाला नाही तर त्यांना त्यांची जागा त्यांच्या पद्धतीने दाखविण्यात येईल असा इशारा इंगवले यांनी दिला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या