मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Sangli Rain : महापुराची धाकधुक वाढली, कोल्हापूर, सांगलीत, पाऊस थांबला पण कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला

Kolhapur Sangli Rain : महापुराची धाकधुक वाढली, कोल्हापूर, सांगलीत, पाऊस थांबला पण कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला

सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तेथील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur, Sangli Rain)

सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तेथील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur, Sangli Rain)

सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तेथील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur, Sangli Rain)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 14 ऑगस्ट : मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने पाणी पातळीत किंचीत घट झाली आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तेथील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur, Sangli Rain) दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज (दि.14) सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे 3 फुटांवर उघडण्यात आले. यामुळे 18,780 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

तसेच यापूर्वी धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 20,880 क्यूसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 105 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात 93.87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हे ही वाचा : घराबाहेर पडण्याआधी लोकलचं शेड्युल नक्की पाहा नाहीतर होईल नुकसान

कोयना धरणात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा संपुष्टात येणारी साठवण क्षमता व आगामी दोन दिवसांत हवामान खात्याने वर्तविलेला ज्यादा पावसाचा अंदाज लक्षात घेता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आणखी उचलून त्यातून ज्यादा पाणी पूर्वेकडे सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आता याहूनही जादा पाणी सोडल्यानंतर नदीच्या पाणी पातळीत आणखी मोठी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

105.25 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणी सामावून घेण्याची क्षमता, आगामी काळातील पाऊस, सध्याची पाणी आवक, पूर्वेकडे कोयना व कृष्णा नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता व पूर्वेकडे संभाव्य महापूराची तीव्रता कमी करण्यासाठी शुक्रवारी धरणाचे दरवाजे दीड फुटांनी उचलून त्यातून व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडले आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने आता दीड फुटाच्या दरवाजातूनही जादा पाणी विसर्ग होत आहे.

हे ही वाचा : Maharashtra Rain : राज्यातील 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शुक्रवारी सायंकाळी पाच ते शनिवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 94 मि.मी., नवजा 119 मि.मी. व महाबळेश्वर 160 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची स्थिती एकूण पाणीसाठा 92.59 टी. एम. सी., उपयुक्त पाणीसाठा 87.59 टी. एम.सी., पाणीउंची 2153.8 फूट, जलपातळी 656.438 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 12.66 टीएमसी पाण्याची गरज आहे. गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 3.62 टीएमसीने तर पाणीउंचीत 2.10 फूट वाढ झाली आहे.

First published:

Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur

पुढील बातम्या