1 कोटीच्या मदतीनंतर शरद पवार घेणार पूरग्रस्तांची भेट, असा आहे दौरा

शरद पवार हे आज पूरग्रस्त सांगली आणि सातारा जिल्ह्यात जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:46 AM IST

1 कोटीच्या मदतीनंतर शरद पवार घेणार पूरग्रस्तांची भेट, असा आहे दौरा

मुंबई, 10 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पूरग्रस्त सांगली आणि सातारा जिल्ह्यात जाणार आहेत. या दौर्‍यात ते पुराने बाधित झालेल्या भागांना भेटी देवून तेथील नागरिकांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत.

शरद पवार यांनी काल (शुक्रवारी )बारामती इथं एक तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी पवारांनी लोकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांच्या या आवाहनाला तालुक्यातील लोकांनी मोठा प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात 1 कोटींचा निधी उभा केला. त्यानंतर आता शरद पवार हे स्वत: पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

कसा असेल पवारांचा दौरा

- सकाळी 09 वाजता तांबावणे ता.फलटण, जि.सातारा येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी

- दुपारी 03 वाजता पलुस, ता.जि.सांगली येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेवून त्यांना दिलासा देणार

Loading...

- सायंकाळी 05 वाजता सांगली येथील पूरग्रस्त भाग आणि कॅम्पला भेट

शरद पवारांनी आवाहन केलं अन् अर्ध्यातासात 1 कोटी रुपयांची मदत जमा

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केलं अन् अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांची मदत जमा झाली. शरद पवार यांनी रयत भवनमध्ये शु्क्रवारी बारामती शहरातील व्यापाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. पूरग्रस्तांच्या मदतनीधीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना मदतीचं आवाहन केलं. या आवाहानाला प्रतिसाद देत व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी भरभरून मदत केली. अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठानकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली. याशिवाय माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी पाच लाखांची मदत दिली. त्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांसह धान्य, कपडे आणि भांड्यांची मदत देण्यात आली. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांनी 400 पोती साखर देण्याचे जाहीर केले.

SPECIAL REPORT : 'आता तुमचा काहीच उपयोग नाही', पूरग्रस्तांनी भाजप मंत्र्यांना सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...