'काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसांचा जीव गेल्यावर?', अजित पवार CM वर भडकले

कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 12:13 PM IST

'काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसांचा जीव गेल्यावर?', अजित पवार CM वर भडकले

मुंबई, 9 ऑगस्ट : सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला? असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.

'कर्नाटकच्या यदियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचं सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी यदियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?' असा सवाल करत अजित पवार यांनी निफाडमधील सभेत सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सांगली-कोल्हापुरात महापूर

सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. अनेक लोक घरात अडकून पडले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरं कोसळली आहेत. घरात पाणी शिरल्याने लोकांनी घरातील सर्व संसार सोडून फक्त अंगावरील कपड्यानिशी सुरक्षित स्थळ गाठण्याचा प्रयत्न पुरग्रस्तांकडून केला जात आहे.

Loading...

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काल रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून कोयना धरणातूनही पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कोल्हापूर-सांगलीमधील पूरपरिस्थिती पुन्हा बिकट होणार आहे.

दुसरीकडे, कृष्णा नदीच्या महापुरामुळं सांगली जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. सांगलीसह नदीकाठी हजारो नागरिक अजूनही पुरात अडकले आहेत. सांगलीच्या गावभागामध्ये नगरसेविकेसह 1000 जण अडकले आहेत.

CM साहेबांना पाठवायचाय व्हिडिओ, हसत बोटीतून प्रवास केल्याने गिरीश महाजन ट्रोल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...