पुराचं पाणी 2 दिवस घरात असेल तरच मिळणार तांदूळ आणि गहू, सरकारचं तुघलकी फर्मान

kolhapur sangali flood management govt decision latest mhas

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 02:41 PM IST

पुराचं पाणी 2 दिवस घरात असेल तरच मिळणार तांदूळ आणि गहू, सरकारचं तुघलकी फर्मान

मुंबई, 9 ऑगस्ट : पुराचं पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार मदत, असा अजब अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होत असून यामुळे पूरग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या पूरग्रस्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यास उशीर केला, असा आरोप करण्यात येत होता. अशातच आता सरकारने दोन दिवस परिसरात किंवा घरात पुराचं पाणी साचलेलं असल्यावरच 10 किलो गहू आणि तांदूळ देणार असल्याचा अध्यादेश काढल्याने पूरग्रस्तांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

पूर नियोजनाच्या मुद्द्यावर अजित पवार सरकारवर बरसले

सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला? असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.

'कर्नाटकच्या यदियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचं सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी यदियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?' असा सवाल करत अजित पवार यांनी निफाडमधील सभेत सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Loading...

VIDEO : '...तर परत कोणत्या नेत्याने गावात यायचं नाही', पूरग्रस्त नागरिकांनी गिरीश महाजनांना घातला घेराव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...