बीडकरांनी जागवली माणुसकी.. पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीकरांना दिला मदतीचा हात

बीडकरांनी जागवली माणुसकी.. पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीकरांना दिला मदतीचा हात

महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पूरस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

  • Share this:

बीड, 9 ऑगस्ट- महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पूरस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक बेघर झाले आहेत. लाखो कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी बीडकर सरसावले आहे. कपडे व खाण्याचे साहित्य गोळा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी पाठवण्यात येणार आहे. या शिवाय बीड जिल्ह्यातील शहरातील शाळा महाविद्यालयांनी फेरी काढून पैसे गोळा केले आहेत. जिल्हा अधिकारी कार्यालय आणि बीड मधील बऱ्याच ठिकाणी हे साहित्य गोळा केले जात आहे.

शहरातील विविध भागातून कपडे व खाण्याच्या पदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्या एकत्र करून कोल्हापूर व सांगलीसाठी पाठवण्यात येत आहेत. याशिवाय बीड शहरातील काही शाळा महाविद्यालयांनी एकत्र येत शहरातून फेरी काढून पैसे गोळा केले आहेत. पैसे व खाण्याच्या वस्तू तसेच कपडे शनिवारी सकाळपर्यंत कोल्हापूर व सांगलीला रवाना करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी दिली. कोल्हापूर व सांगलीकरांसाठी दाखवलेल्या बीड कराच्या माणुसकी सर्वत्र कौतुक होत आहे. सगळ्या उपक्रमात बीड जिल्ह्यातील विविध संस्था संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तसेच शाळा महाविद्यालयांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहायला मिळाले असे ज्येष्ट संपादक संजय मालाणी यांनी सांगितले.

CM साहेबांना पाठवायचाय व्हिडिओ, हसत बोटीतून प्रवास केल्याने गिरीश महाजन ट्रोल!

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2019, 5:11 PM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading