Home /News /maharashtra /

Weather : दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढचे 3 तास Alert! विजांच्या कडकडाट, वादळी पावसाची शक्यता

Weather : दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढचे 3 तास Alert! विजांच्या कडकडाट, वादळी पावसाची शक्यता

कुठल्या जिल्ह्यांना हवामान विभागाने (IMD) High Alert दिलाय वाचा... (weather alert)

    कोल्हापूर, 19 मे : कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, या जिल्ह्यात पुढच्या तीन तासांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (thunderstorm) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे पश्चिमदिशेने वारे वाहत आहे असल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. (weather alert) दरम्यान हवामान खात्याकडून कोल्हापूर, सांगली  आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे अधिकारी होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान वर्धा शहरात काल सर्वाधिक उष्ण तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. हेही वाचा :  Raj Thackeray Rally in Pune: मनसेचं ठरलं, पुण्यात 'राज' गर्जना होणारच..., पाहा कुठे आणि कधी होणार राज ठाकरेंची सभा दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे. राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Todays weather, Weather forecast

    पुढील बातम्या