शाहू महाराजांचं कोल्हापूर! 'ईद'ला मुस्लीम समाज बकरी न कापता पूरग्रस्तांना करणार आर्थिक मदत

शाहू महाराजांचं कोल्हापूर! 'ईद'ला मुस्लीम समाज बकरी न कापता पूरग्रस्तांना करणार आर्थिक मदत

कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 11 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराचा आजचा सातवा दिवस आहे. कोल्हापूरमधील काही भागात आज सातव्या दिवसानंतरही सर्वाधिक भीषण पूरपरिस्थिती आहे. या पुरामध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही परिस्थिती लक्षात घेत शाहू महाराजांची नगरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरात पूर आल्यानंतर महाराष्ट्रात माणुसकीचा महापूर आला आहे. समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने यंदाच्या बकरी ईदला आर्थिक कुर्बानी करण्याचा निश्चय केला आहे.

मुस्लीम समाजातील काही युवकांनी केलेलं आवाहन

"शेतकरीवर्गाचे हाल - हाल झालेले आहेत , मुक्या प्राण्यांची वाताहात झालेली आहे . लाखो लोक बेघर झालेले आहेत . उद्योग-व्यवसाय ठप्प झालेले आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. रोगराई बरोबर मुकाबला करावा लागेल. घरांची डागडुजी करावी लागेल. बेकारी व दारिद्र्य वाढीस लागेल. एकूणच सामान्य माणूस हा होरपळून निघत आहे. तर आज राजश्री शाहू महाराज यांच्या करवीर नगरीतील मुस्लीम समाजाने सर्वानुमते एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . आता येत असणारी " बकरी ईद " ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. माझे सागंली जिल्हातील पूरग्रस्त भाग सोङून जे मुस्लीम बाधंव आहेत त्यांनी ही हा निर्णय घ्यावा आणि एका बोकडाचा जवळपास 20 हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला जावा. इस्लामचे मूलभूत तत्व हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. शासकीय मदत ही तटपुंजी असणार आहे. लोक निराधार आहेत. आज त्यांना आधाराची गरज आहे . तो आधार देण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. आपण मुस्लिम बांधव मदरसा इथं कुरबानीचा हिस्सा देवून आपली " कुर्बानी" ही करून ईश्वराचे आदेश पाळून आपली मूलभूत तत्वाचे पालन करून एखाद्याच्या अंधारमय जीवनात मिनमिनता का होईना प्रकाश पाङू शकता. उदाहरणार्थ एक बोकङ 20000 / रुपये त्यांचा एक हिस्सा हा 5000/ रुपये आपण देवून आपली " कुर्बानी " पार पाङू शकता. तसंच राहिलेले 15000 /रुपये आपण स्वतः आपल्या हाताने बाधित पूरग्रस्ताला शक्य ती मदत करून त्याचं जीवन सुसह्य करू शकता ....

पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की आपल्या शेजारच्या घरात जर अन्न शिजत नसेल व तर आपले घरातील अन्न हे पहिल्यादा त्या घरात दिले पाहिजे...तो कोणत्याही धर्माचा वा जातीचा असू दे...तर चला आपण आपल्या बाधंवाची मदत करू! तरी या सूचनेची आपण गांभीर्याने दखल घेवून योग्य निर्णय घेतला जावा ही विनंती. मला जे योग्य वाटले ते मी नमूद केले आहे."

आकाशातून असा दिसतंय पूरग्रस्त कोल्हापूर, पाहा नुकताच काढलेला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading