होत्याचं नव्हतं झालं, हक्काचा निवाराच उद्धवस्त झाला; महापुराच्या हाहाकाराची भीषणता दाखवणारे PHOTOS

पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरं कोसळली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 09:32 AM IST

होत्याचं नव्हतं झालं, हक्काचा निवाराच उद्धवस्त झाला; महापुराच्या हाहाकाराची भीषणता दाखवणारे PHOTOS

सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. अनेक लोक घरात अडकून पडले आहेत.

पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हालवण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हालवण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरं कोसळली आहेत.

पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरं कोसळली आहेत.

घरात पाणी शिरल्याने लोकांनी घरातील सर्व संसार सोडून फक्त अंगावरील कपड्यानिशी सुरक्षित स्थळ गाठण्याचा प्रयत्न पुरग्रस्तांकडून केला जातोय.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

Loading...

काल रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून कोयना धरणातूनही पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कोल्हापूर-सांगलीमधील पूरपरिस्थिती पुन्हा बिकट होणार आहे.

दुसरीकडे, कृष्णा नदीच्या महापुरामुळं सांगली जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.

सांगलीसह नदीकाठी हजारो नागरिक अजूनही पुरात अडकले आहेत. सांगलीच्या गावभाग मध्ये नगरसेविकेसह 1000 जण अडकले आहेत.

घरं कोसळल्याने अनेकांसमोर आता निवाऱ्याचाच प्रश्न तयार झाला आहे.

तळकोकणात पुन्हा एकदा आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . विशेषत: दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात अनेक गावात पाणी भरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 09:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...