भीषण अपघातात क्रूझरचा चेंदामेंदा, 4 जण जागीच ठार

भीषण अपघातात क्रूझरचा चेंदामेंदा, 4 जण जागीच ठार

अपघातात चार जण जागीच ठार झाले असून इतर चार जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 10 जुलै : क्रूझर आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून इतर चार जण जखमी झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती इथं डंपरने क्रूझर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता इतकी होती की क्रूझर गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात चार जणांना आपले प्राण गमावले आहेत. तर इतर चौघांवर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्रूझर गाडीत प्रवास करणारे सर्वजण गोकुळशिरगावकडे चालले होते. पण भोगावती परिसरातील घोटवडे गावाजवळ पोहचल्यानंतर समोर आलेल्या डंपरने क्रूझरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या साथीने मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. यामध्ये जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

अपघातग्रस्त गाडीतील सर्व प्रवासी हे पीरळ शिरोली, तारळे कुडूत्री परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची घटना कळल्यानंतर मृतांच्या मूळ गावात मोठा आक्रोश आला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. या अपघातांमध्ये वर्षभरात हजारो लोकांनी आपला जीव गमावल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

VIRAL FACT : रेल्वे स्टेशनवर तोंडाने बंद केले जाते पाण्याची बॉटली? हे आहे सत्य

First published: July 10, 2019, 9:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading