कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना! कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार

कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना! कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार

कोल्हापूर पोलीस दलातर्फे दोनही शहिदांच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांचे साहाय्य लवकरच सुपुर्द करण्यात येणार आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 फेब्रुवारी : पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यामध्ये बुलडाण्यातीलही दोन जवानांचा समावेश आहे. बुलडाण्यातील या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलामार्फत शनिवारी एक दिवसाचा पगार जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलीस दलातर्फे दोनही शहिदांच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांचे साहाय्य लवकरच सुपुर्द करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

शहिदांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलीस दलांतर्गत विविध घटकातून निधी संकलनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच लागू केलेल्या निर्देशानुसार अधिकारी, कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही मदत लवकरच शहिद कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाणार आहे.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्रातील जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला :

पुलवामा येथील अवंतीपुरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

VIDEO : काळजाचं पाणी झालं, जेव्हा वीरपत्नीने बहाद्दुर पतीला केला 'अखेरचा सलाम'

First published: February 17, 2019, 9:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading