'...तर तुमचा कॉल यमराजाला लागेल', कोल्हापूर पोलिसांची लयभारी पोस्ट

'...तर तुमचा कॉल यमराजाला लागेल', कोल्हापूर पोलिसांची लयभारी पोस्ट

कोल्हापूर पोलिसांनी केलेली यमराजाची पोस्ट सध्या चर्चेत असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 25 डिसेंबर : रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करणे, रस्ते अपघात कमी व्हावी यासाठी जनजागृती करण्यासाठी पोलिस सातत्याने वाहनधारकांना सूचना देत असतात. तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासाठी पोलिस वेगवेगळी शक्कल लढवतात. मुंबई आणि नागपूर पोलिसांनी चित्रपटातील गाण्यांचा आधार घेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नियम समजावून दिले होते. आता कोल्हापूर पोलिसांनीही लयभारी पोस्ट शेअर केली आहे.

गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना सावध कऱण्यासाठी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. यामध्ये गाडीवरून जाणाऱ्याने फोन कानाला लावला आहे. त्याची रेंज टॉवरकडून थेट यमराजाकडे गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात यमराज म्हणतो की, लक्षात ठेवा गाडी चालवत असताना तुमचा फोन मला सुद्धा लागू शकतो.

फोनवर बोलत गाडी चालवण्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा वेळी गाडी बाजुला घेऊन नंतर फोनवर बोलणं योग्य असतं.

नव्या वाहतुक कायद्यानुसार दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी, वाहतुकीचे नियम पाळले जावेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कायदा कडक करण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हा कायदाबदल आहे. पात्रता नसतानाही गाडी चालवणाऱ्यांना इतके दिवस 500 रुपये दंड होत होता. तोच आता 10 हजार रुपये झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात होता. तोही आता 10000 रुपयांवर गेला आहे. लायसन्स बरोबर नसेल तर 500 ऐवजी आता 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अ़डवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या