भुदरगड, 12 फेब्रुवारी : कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गारगोटी शहरात पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत आरोपी सुभाष देसाई याने अतिक्रमण केलं होतं. यावर गेले दोन दिवस कारवाई केली जात होती. त्याच्या इतर अनेक ठिकाणच्या अतिक्रमणावर पोलिसांनी कारवाई केली होती. नियमांनुसार पोलीस निरीक्षकांनी कारवाई करीत येथील अतिक्रमण हटवलं. या रागात आरोपीने पोलीस निरीक्षकाचं घर पेटवण्यात आलं आहे. हा प्रकार अचानक घडल्याचे या भागात खळबळ उडाली आहे. घराचा काही भाग पेटत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आलं. शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. या प्रकारात घराचा काही भाग पेटला आहे. तरी घरातील सदस्यांना सुखरुपस्थळी हलविण्यात आलं आहे. या प्रकारात पोलीस निरीक्षकाची चारचाकी गाडीही जळून खाक झाली आहे. या प्रकारात कोणी प्रत्यक्षदर्शी होते का याचा शोध घेतला जात आहे. या प्रकारानंतर आरोपी सुभाष देसाई याचा तपास सुरू झाला होता. घर पेटविण्यामागे त्याचा हात असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र गारगोटी शहरातून पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत होते. अखेर आरोपी सुभाष देसाई याला महागावमधून अटक करण्यात आली आहे. तो या प्रकारानंतर पळून गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. काही वेळातच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बातमी अपडेट होत आहे...