मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Rain Update : कोल्हापूर पंचगंगा नदीची पुन्हा धोका पातळीकडे वाटचाल, 24 तासात तब्बल सव्वा फुटाने पाणी पातळीत वाढ

Kolhapur Rain Update : कोल्हापूर पंचगंगा नदीची पुन्हा धोका पातळीकडे वाटचाल, 24 तासात तब्बल सव्वा फुटाने पाणी पातळीत वाढ

कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत (panchaganga river water level hike) असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे. (Kolhapur rain update)

कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत (panchaganga river water level hike) असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे. (Kolhapur rain update)

कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत (panchaganga river water level hike) असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे. (Kolhapur rain update)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 10 जुलै : मागच्या दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर थोडा कमी झाला होता, परंतु कालपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (Kolhapur Rain Update) कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात (Kolhapur district dam area heavy rain fall) देखील दमदार अतिवृष्टी बरसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. (panchaganga river water level hike) कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे. (Kolhapur flood situation) दरम्यान मागच्या 24 तासांत तब्बल 1 फूट 3 इंचांनी पाणी वाढले आहे. पाऊस असाच राहिला तर पुढच्या 24 तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. भरण 50 टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण भरण्याची शक्यता आहे. काल मागच्या 24 तासांत १२० मि.मी. पाऊस झाला तर सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत झालेल्या 20 दहा तासांत 46 मि.मी. इतका पाऊस झाला, जूनपासून आजअखेर 2067 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा : दुर्गवाडी डोंगराचा तडा वाढू लागला, परशुराम घाट आणखी 3 दिवस बंद

धरणातून विज निर्मितीसाठी 1350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. धरणात 4069.49 द. ल. म.पू. इतका पाणी साठा असून पाणी पातळी 318.84 इतकी झाली आहे. दरम्यान, जोमदार व दमदार पावसामुळे बळीराजा भात रोप लावणीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर पडले आहे. वाढत्या पाण्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे ग्रामीण भागात पुरपट्ट्यात ग्रामस्थांनी महापुराची धास्ती घेतली आहे. स्थलांतरित होण्याच्या विचाराने व परत संसार उघड्यावर पडणार या विचाराने अनेक कुटुंबे चिंतातूर झाल्याचे दिसत आहेत. मळे भागात वास्तव्यास असणारे शेतकरी कुटुंबांचे देखील जनावरांचे तळ इतरत्र हलवावे लागणार या चिंतेत आहेत. त्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. या चिंतेने शेतकऱ्यांचे देखील धांदल उडाल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा : Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहे तुमच्या शहरातील भाव?

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अणदूर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून (5.75 दलघमी) असून 80 cusecs इतका विसर्ग सुरू आहे. कोदे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून 900 Cusecs विसर्ग सुरू आहे. वेसरफ तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सरासरी 100 Cusecs विसर्ग सुरू आहे. गगनबावडा तालुक्यातील सर्व ल.पा.पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामुधन सरासरी 1000 ते1100 cusecs इतका विसर्ग सुरू आहे. कुंभी मध्यम प्रकल्प परिसर आज सकाळी 7 ते  सायंकाळी 4 वाजेपर्यंत  34 मि मी तर एकूण 1728 मि मी इतका पाऊस झालेला आहे विद्युत निर्मिती विमोचकामधून 300 cusecs इतका विसर्ग सुरू आहे.

First published:

Tags: Kolhapur, Rain flood, Rain in kolhapur, Rainfall, Weather forecast, Weather update

पुढील बातम्या