मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरातील गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस

कोल्हापुरातील गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस

गगनबावडा इथं दुपारी 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

गगनबावडा इथं दुपारी 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

गगनबावडा इथं दुपारी 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

  • Published by:  Akshay Shitole
कोल्हापूर, 17 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा इथं दुपारी 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाळा सुरू असल्याप्रमाणे गगनबावड्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला. मार्च महिन्यातच गगनबावड्यात मुसळधार पावसाने नागरिक सुखावल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, कोल्हापूर शहरातही दुपारपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 17 ते 22 मार्चदरम्यान औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील भोपाळ, बैतूल, होशंगाबाद आणि देवास यासारख्या काही प्रमुख ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर वाईट बातमी महाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण कोरोना व्हायरससाठी पोषक असल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात 6 अंशांपर्यंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
First published:

Tags: Kolhapur, Kolhapur rain

पुढील बातम्या