नादखुळा, कोल्हापुरात अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं

पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील तरुण गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेला होता. तेथेच त्यांच्या बाळाचा जन्म झाला.

पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील तरुण गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेला होता. तेथेच त्यांच्या बाळाचा जन्म झाला.

  • Share this:
कोल्हापूर, 29 जुलै : कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशाच एका अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. आई आणि बाळाला पन्हाळा येथील एकलव्य कोरोना काळजी सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सेंटरमधून त्यांच्यासह 9 जणांचे टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील 35 वर्षाचा तरुण गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेला होता. तेथेच त्यांच्या बाळाचा जन्म झाला. दिनांक 16 जुलै रोजी ते सुरतहून आपल्या पत्नी आणि सासूसह कोल्हापूरमध्ये आले होते. किणी तपासणी नाक्यावरून त्यांना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोविड सेंटर इथं पाठवण्यात आले होते. दिनांक 17 जुलै रोजी या चौघांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 जुलै रोजी चौघांचेही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. तेंव्हापासून या चौघांना या सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आता त्रास सहन होईना, कर्वेनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; पुणे हादरलं! 'आई म्हणून सुरुवातीला बाळाची खूप काळजी वाटत होती. थोडी भीतीही वाटत होती. परंतु, नंतर पतीने धीर दिला आणि भीती लोप पावली, अशी प्रतिक्रिया बाळाच्या आईने दिली. तर 'अजिबात भीती बाळगू नका. परंतु, काळजी मात्र घेतली पाहिजे', अशी प्रतिक्रिया बाळाच्या वडिलांनी दिली. प्रोटोकॉल नुसार, केंद्रातील बाधितांवर उपचार करण्यात आले. या केंद्रातून आज एकूण 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज कार्ड देवून टाळ्या वाजवून निरोप देण्यात आल्याचं वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा ठरला, असा आहे कार्यक्रम! डॉ. गायकवाड आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जावेद कच्छी, डॉ. स्वानंद मिरजकर, डॉ. अरविंद शिनोळकर, डॉ. सुप्रिया ढोले, पर्यवेक्षक गोपाळ पाटील, परिचारिका रुपाली पाटील, अरुणा मांगले आदींच्या पथकाने या केंद्रातील बाधितांवर उपचार केले.
Published by:sachin Salve
First published: