कोल्हापूर : भाचा जिंकला म्हणून मामानं केला हवेत गोळीबार, पाहा VIDEO

कोल्हापूर : भाचा जिंकला म्हणून मामानं केला हवेत गोळीबार, पाहा VIDEO

भाचा जिंकला म्हणून मामा एकदा नाही तर चारवेळा केला हवेत गोळीबार

  • Share this:

कोल्हापूर, 11 फेब्रुवारी: आनंद साजरा करण्यासाठी लोक पेढे, लाडू मिठाई किंवा फटाके फोडतात मात्र कोल्हापुरात चक्क आनंदाच्या भरात हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात रविवारी पार पडलेल्या 50 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्यानं आनंद झाला होता. त्याचा आनंद गगनात मावेना झाला त्याने भाचाला जल्लोषात घरी आणलं आणि आनंद साजरा करत हवेत गोळीबार केला आहे. एक नाही तर तब्बल चारवेळा त्याने हवेत फायरिंग केलं. आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे. उपस्थित असलेल्यांनी टाळ्या वाजवून भाच्याचा आनंद व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हवेत गोळीबार करणाऱ्यावर कोल्हापूर पोलीस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशापद्धतीनं आनंद साजरा करणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. हवेत गोळीबार होत असताना स्थानिक नागरिकांनी भीतीपोटी घराचे दरवाजे बंद करून घेतले. भाचा जिंकल्याच्या नादात हवेत गोळीबार करणाऱ्या मामावर पोलीस कारवाई करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: February 11, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या