कोल्हापूर, 05 मार्च : कोल्हापूर (Kolhapur) शहरासह जिल्ह्यात यंदाचं वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. जवळपास दोन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत, त्यातच अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुकाही होणार आहेत. पण महत्त्वाचं लक्ष लागले आहे ते गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर महापालिकेच्या (kolhapur municipal corporation election 2021) निवडणुकीकडे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अजून जाहीर झालेले नाही पण मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
याच तयारी पैकी एक तयारी म्हणजे मतदार याद्या तयार करणे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे काम झाल्यानंतर आता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मतदार याद्या तयार करत आहेत मात्र, या मतदार याद्यांबाबत भरमसाठ हरकती आल्याने त्या निकालात काढता काढता अधिकारी त्रासून गेले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे.
आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतरही मुंबईत पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरूच, VIDEO
16 फेब्रुवारीला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, त्यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. या मुदतीत तब्बल अठराशे हरकती दाखल झाल्या आहेत आणि इतक्या हरकती दाखल झाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामातला उथळपणा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे सध्या शहरासह जिल्ह्यात या हरकतींची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी ही 2 मार्चपर्यंत तयार करून ती निवडणूक आयोगाला सादर करायची होती पण मतदार यादीचा घोळ काही केल्या मिळत नसल्याने ही यादी अजूनही निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेली नाही. थोडा वेळ लागला तरी चालेल पण निर्दोष यादीच तयार करून निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहितीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
अवहेलना थांबणार तरी कधी? सावरकरांनी लढा उभारलेल्या गावातून थेट मोदी सरकारला सवाल
प्रशासनाकडून ही सगळी तयारी सुरू असली तरी अनेक प्रभागांमध्ये हौशी उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मतदारांच्या गाठी भेटी घ्यायला आतापासूनच सुरुवात झाली आहे तर राजकीय पक्ष आणि नेत्यांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक नेमकी कधी होणार हे अजूनही जाहीर झालेलं नाही. जर निवडणूक पुढे ढकलली गेली तर ती वर्षाअखेरीस होऊ शकते त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडणार आहे. पण एकंदरीत काय तर मतदार यादीबाबतच्या हरकतींची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.