VIDEO : कोल्हापूर महानगरपालिकेत दोन नगरसेवकांनी घेतलं चुंबन, महिलांसमोरच घडला प्रकार

VIDEO : कोल्हापूर महानगरपालिकेत दोन नगरसेवकांनी घेतलं चुंबन, महिलांसमोरच घडला प्रकार

कोल्हापूर महापालिकेची सभा सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 30 जानेवारी : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात किळसवाणा प्रकार घडला आहे. दोन पुरुष नगरसेवकांनी एकमेकांचं चुंबन घेतल्याचं दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. कोल्हापूर महापालिकेची सभा सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोल्हापूर महापालिकेत पालिकेचं नियमित काम सुरू होतं. तेव्हाच चेष्टा मस्करीमधून एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाच्या गालाचे चुंबन घेतलं. यामध्ये दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या गालाचे चुंबन ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे या नगरसेवकानं घेतलं.

महापालिकेत सभा सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानंतर सर्व नगरसेवकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. दरम्यान, महापालिकेत महिला नगरसेवकांच्या समोरच हा किळसवाणा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक ठिकाणी जबाबदारपणे वर्तन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र कोल्हापूरमध्ये नगरसेवकांनी थेट महापालिकेतच केलेल्या या कृत्यानंतर आता टीका करण्यात येत आहे.

First published: January 30, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या