मुंबई, 26 नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC election) अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत (Kolhapur MLC Election) भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे (BJP Candidate Amal Mahadik withdraw application) घेतला आहे. यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील (Congress Satej Patil won unopposed) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच शौमिका महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर दवेंद्र फडणवीस यांचा दुपारी दीड वाजता फोन आला आणि त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या दोन जागांसाठी कोल्हापूर सोडले
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, धुळे- नंदुरबार आणि मुंबई या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूर विधान परिषदेची जागा सोडली आहे. या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापुरची जागा सोडली.
सतेज पाटील बिनविरोध
कोल्हापुरात काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने अमल महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामुळे ही लढत अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. पण आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची निवड बिननिरोध होणार आहे.
वाचा : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळाअसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.